मातोंड उपसरपंचपदी शिवसेनेचे वासुदेव कोंडये बिनविरोध

445
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

वेंगुर्ले, ता. २६ : तालुक्यातील मातोंड ग्रामपंचायत उपसरपंचपदी शिवसेनेच्या वासुदेव कोंडये यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून शिवसेनेच्या वतीने त्यांचे पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले.
मातोंड ग्रामपंचायतवर शिवसेनेची सत्ता असून सरपंच जानवी परब व नऊ पैकी सात सदस्य हे शिवसेनेचे आहेत. दरम्यान यावेळी शिवसेना पक्ष संघटनेत ठरल्याप्रमाणे प्रथम सव्वा वर्षासाठी सुभाष सावंत यांना उपसरपंच पदाचा मान देण्यात आला होता. यानंतर सव्वा वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुभाष सावंत यांनी २९ मे २०१९ रोजी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. यामुळे मातोंड उपसरपंच पद हे रिक्त झाले होते. यानुसार पुढील प्रक्रिया पूर्ण करून या उपसरपंच पदासाठी आज (२६ जून) मातोंड ग्रामपंचायत येथे खास सभा आयोजित करून या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी वासुदेव कोंडये यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल होऊन ते वैध झाल्यामुळे त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी तुषार हळदणकर यांनी काम पाहिले.
श्री कोंडये यांची उपसरपंचपदी निवड होताच पंचायत समिती सदस्य श्यामसुंदर पेडणेकर, सरपंच जानवी परब, शिवसेना उपतालुकप्रमुख शशिकांत परब, तंटामुक्ति अध्यक्ष तुकाराम परब, युवासेनेचे राहुल प्रभू, माजी उपसरपंच सुभाष सावंत, ग्रा प सदस्य अस्मिता परब, सुश्मिता परब, सुविधा नेमण, दयानंद वेंगुर्लेकर, सुवर्णलता जबडे, महानंदा घाडी, शिवसेनेचे सुखाजी परब, जगदीश परब, ग्रामविकास अधिकारी तुषार हळदणकर, कर्मचारी अरुण रेडकर, पूजा वराडकर यांनी त्यांचे पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

\