महामार्ग दुरवस्थेबाबत उद्या मुंबईत बैठक

2

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील घेणार आढावा : आमदार वैभव नाईक यांची माहिती

कणकवली, ता.26 : महामार्ग चौपदरीकरणाच्या निकृष्ट कामामुळे मुंबई गोवा महामार्गची दुर्दशा झाली आहे. याबाबत आमदार वैभव नाईक यांनी आज मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे लक्ष वेधले. त्याअनुषंगाने उद्या (ता.27) सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात बैठक होणार असल्याची माहिती आमदार श्री.नाईक यांनी दिली.
मुंबई गोवा महामार्ग चिखल आणि खड्डेमय झाला आहे. या खड्डयात आदळून दररोज अपघात होत आहेत. तसेच ठिकठिकाणी रस्ता खचल्याने मोठ्या अपघातांचीही शक्यता आहे. त्यामुळे महामार्ग सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करावी अशा मागणीचे निवेदन आमदार वैभव नाईक यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले. यानंतर श्री.पाटील यांनी उद्या (ता.27) दुपारी 2 वाजता विधानसभा दालनात महामार्ग अधिकार्‍यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महामार्ग सुरक्षित राखण्याबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता असल्याचीही माहिती श्री.नाईक यांनी दिली.

1

4