शासकीय वैद्यकिय महाविद्यालयासाठी पत्रांची मोहिम अंतिम टप्प्यात

2

दोडामार्ग पोस्ट मास्तरांकडे सुपूर्त करणार : श्याम सावंत यांची माहिती

दोडामार्ग, ता. 26 : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना लिहिण्यात आलेली पत्रे उद्या दोडामार्ग पोस्ट कार्यालयात जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या ठिकाणची जमलेली पत्रे संबंधित पोस्ट मास्तरांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती या अभियानाचे समन्वय समितीचे अध्यक्ष श्याम सावंत यांनी दिली आहे. उद्या गुरुवार दिनांक 27 ला सकाळी साडेअकरा वाजता सर्व कार्यकर्ते व सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय व्हावे असा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

4