सत्ता,नेते तुमच्याकडे मग…नौटंकी कशासाठी…

2

विद्यार्थी सेनेच्या सुभेदारांचा युवा सेनेच्या नाणोस्करांना सवाल…

सावंतवाडी ता.२७: जिल्ह्यातील आयटीआयचा प्रश्न गंभीर आहे,ही वस्तुस्थिती आहे.त्या ठिकाणी सर्व आयटीआय मध्ये प्राचार्य निवडणे गरजेचे आहे.मात्र त्यासाठी युवा सेनेचे सागर नाणोस्कर व त्यांचे अन्य सहकारी यांनी केवळ नौटंकी करण्यापेक्षा तो प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा.त्यांचेच आमदार,खासदार असताना,त्यांच्याकडे सत्ता असताना गेट बंद आंदोलन करण्याची वेळ येते हे दुर्दैव आहे,अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केली आहे.
जिल्ह्यातील आयटीआय मधील रिक्त पदे भरण्यात यावी यासाठी काल युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख सागर नाणोस्कर यांनी गेट बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.या इशाऱ्यानंतर श्री सुभेदार यांनी आपली प्रतिक्रिया प्रसिद्धी पत्रकांच्या माध्यमातून दिली आहे.
त्यात असे म्हटले आहे की, त्यांचा प्रश्न सुटणे ही काळाची गरज आहे.परंतु ज्या नाणोस्कर व सहकारी पदाधिकाऱ्यांनी गेट बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांचे वरिष्ठ नेते सत्ताधारी पक्षात आहे. स्थानिक आमदार,खासदार त्यांचेच आहेत,अशा परिस्थितीत त्यांच्यावर आंदोलन करण्याची पाळी का यावी,असा प्रश्न श्री.सुभेदार यांनी व्यक्त केला आहे.

11

4