वेंगुर्ले तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत होत असलेली कामे निकृष्ठ दर्जाची |राजन तेली यांचा आरोप : अभियंत्यांना निवेदन

157
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले, ता. २७ :वेंगुर्ले तालुक्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत होत असलेली कामे निकृष्ठ दर्जाची होत आहेत. ती दर्जेदार झाली पाहिजेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांची भाजपा प्रदेश चिटनीस राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई व पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत वेंगुर्ले तालुक्यात किमान ५ ते ६ कामे मंजूर आहेत त्यापैकी एक आसोली न्हैचीआड ते पाल कदमवाडी हे काम गेली दोन वर्षे सुरु असुन अद्याप पुर्ण झाले नाही व झालेले काम हे गुणवत्तेनुसार झालेले नसुन त्याबद्दल पाल ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांची सदर कामाबाबत तक्रार आहे. दुसरे काम वायंगणी हुलमेखवाडी ते नांदोसकर कोंडुरा तिठा हे काम सुद्धा निकृष्ठ पद्धतीने चालु आहे . ग्रामस्थांनी याबाबत ठेकेदारास विचारणा केली असता सदर ठेकेदार उडवाउडवीची उत्तरे देतो.
तुळस मुख्यरस्ता ते काजरमळी रस्ता हे काम सुध्दा मंजूर असुन ठेकेदाराच्या नाकर्तेपणामुळे सदर काम अद्याप सुरु झालेले नाही, त्यामुळे ग्रामस्थांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून सदर ठेकेदारास काळया यादीत टाकण्यात यावे अशी मागणी होत आहे. म्हापण निवती रस्त्याच्या कामाला सुरवात झाली असुन रुंदीकरणास एका माणसाने विरोध केल्याने निवती हद्दीतील शाळेपासुन साई मंदीरा पर्यंत रस्त्याचे कोणतेही काम झालेले नाही, त्यामुळे सद्यस्थीतीत रस्त्यावर खड्डे असल्याने वाहन चालकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तरी ठेकेदाराकडुन खड्डे बुजवुन घेऊन रस्ता वाहतुकीस योग्य करावा. आदी सर्वच कामासंदर्भात कार्यकारी अभियंता श्री घाडगे साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपा चे प्रदेश चिटनीस राजन तेली, तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई ,निवती सरपंचा सौ. भारती धुरी, ग्रामपंचायत सदस्या वीरश्री विरोचन मेथर, त्रुप्ती कांबळी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

\