प्रवाशांना गळकी बस पाठवल्याने मनसे आक्रमक ; आगार व्यवस्थापकांना घेराव

2

सावंतवाडी, ता. २७ : एसटी प्रवाशांसाठी गळकी बस पाठवल्याने मनसे पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी आगार व्यवस्थापक एस बी सय्यद यांना घेराव घातला. यापुढे अशा बस आढळून आल्यास रस्त्यावर उतरून गाड्या रोखू असा इशारा त्यांनी दिला. आज सकाळी सोडण्यात आलेली सावंतवाडी भटपावणी एसटी बस पावसात गळू लागली.याचा त्रास प्रवाशांना झाला.याबातची माहिती मिळताच मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांना धारेवर धरले.श्री. सय्यद यांनी गळत असलेल्या एसटी बस दुरुस्ती करून घेण्यात येतील असे आश्वासन दिले.
यावेळी मनसे परिवहन जिल्हाध्यक्ष ॲड राजू कासकर, मनविसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार, संतोष भैरवकर, अतुल केसरकर, शुभम घावरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

23

4