स्कुबा डायव्हींगची मजा आता सावंतवाडीच्या मोती तलावात

2

 

नगराध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन: वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्सचा अनुभव घेता येणार

सावंतवाडी, ता.२७: येथील मोती तलावात सुरू करण्यात आलेले स्कुबा डायव्हिंग आणि बोटींचा थरार शहराच्या विकासात भर टाकेल. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ती वेगळी पर्वणी ठरेल असे प्रतिपादन सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केले. सावंतवाडी पालिका व राज स्कुबा डायव्हिंग शिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मोती तलावात स्कुबा ड्रायव्हिंग प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आले आहे.
या सुविधेचे उद्घाटन आज नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.या प्रसंगी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, सभापती आनंद नेवगी, बाबू कुडतरकर, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, अँड.परिमल नाईक, सुधीर आडिवरेकर,मनोज नाईक भारती मोरे ,दिपाली भालेकर उदय नाईक,माधुरी वाडकर,सतीश पाटणकर,जगदीश मांजरेकर,स्कुबा डायव्हींगचे प्रमोद नाईक,राजेश नाईक,राहुल शेणई,पप्पू काजरेकर,मनोज नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी श्री साळगावकर म्हणाले स्वच्छ आणि सुंदर सावंतवाडी अशी सावंतवाडी ची ओळख आहे. त्यात सावंतवाडी येणाऱ्या पर्यटकांना स्थिरावण्यासाठी वेगळे काय करता येऊ शकते का याचा विचार सुरू होता. त्याचवेळी शिरोडा येथील राज स्कुबा ड्रायव्हिंगच्या व्यावसायिकांच्यावतीने पालिकेकडे बोट क्लब मागितला. पर्यटनासाठी हा बॉट क्लब सुरु व्हावा यासाठी प्रयत्न सुरू होते.या पाश्वभूमीवर पुन्हा एकदा सावंतवाडी शहरात बोटिंगची सुविधा आणि विशेष करून स्कुबा डायव्हींग अनुभवता येणार आहे.एरवी समुद्रात करण्यात येणारे स्कुबा डायव्हींग आता तलावात सुद्धा होणार आहे.त्यामुळे येथील पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा.
याविषयी प्रमोद नाईक म्हणाले लोकांना चांगली सेवा देण्यासाठी आमचे नेहमी प्रयत्न असणार आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून विविध सेवा देण्याचा आमचा मानस आहे. यात याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना आकर्षक करण्यासाठी विविध सेवा आपण देणार आहोत.

19

4