आंबोलीत साकारणार फुलपाखरू उद्यान

193
2

निविदा प्रक्रिया सुरू : नरेंद्र डोंगर, तोंडवलीचा विकास होणार

सावंतवाडी / भक्ती पावसकर, ता. 27 : आंबोली येथे होणार्‍या फुलपाखरू उद्यानासाठी प्रयत्न सुरू करण्यात आलेे आहेत. त्यासाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया वनविभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या फुलपाखरू उद्यानासह सावंतवाडीच्या नरेंद्र डोंगराचा विकास आंबोली व तोंडवली येथील वनक्षेत्राचा विकास आदी अनेक कामांचा समावेश असून वन पर्यटनाकडे लोक वळावेत या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत, असा विश्वास सावंतवाडीचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून जंगल सफर हा मुद्दा पुढे करून केरळच्या धर्तीवर येथील वन उद्यानाचा विकास करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याला आता सुरवात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर यासाठी आवश्यक असलेल्या निविदा प्रक्रिया काढण्यात आल्या आहेत. यात आंबोली येथील फुलपाखरू उद्यानासह नरेंद्र डोंगर येथे इंटरपिटीशन, वूडन कॉटेज, तोंडवली व आंबोली येथे वूडन कॉटेज आदींचा यात समावेश आहे. हे प्रकल्प मार्गी लागल्यास याचा फायदा तिन्ही ठिकाणच्या पर्यटन वाढीसाठी होणार आहे.

4