शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीची पत्रे दोडामार्ग पोस्ट मास्तरांकडे सुपूर्त

2

दोडामार्ग, ता. २७: सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सिंधुदुर्गातील नागरिकांनी लिहिलेली हजारो पत्रं दोडामार्ग पोस्ट ऑफिसला सादर करण्यात आली.यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समिती, सिंधुदुर्गचे समन्वयक अँड शामराव सावंत, धनश्री गवस, डॉ. मनस्वी राऊळ, प्रा संदीप गवस,विजय चव्हाण, डॉ.दिव्या गवस, अभय किनळॊस्कर आदी उपस्थित होते.तसेच १ जुलै रोजी सावंतवाडी येथील पोस्ट ऑफिसमध्ये सकाळी ११ वाजता सादर करण्यात येणार आहेत
प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात येणार येणार आहे.जमलेली पत्रे संबंधित पोस्ट मास्तरांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. अशी माहिती अँड शामराव सावंत यांनी दिली.

15

4