मालवण तालुक्यात सर्वाधिक 181 मि.मी पाऊस…

2

सिंधुदुर्गनगरी 27; जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असून मालवण तालुक्यात सर्वाधिक १८१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात १००.२७ मिलीमीटर सरासरी पाऊस झाला असून १ जून २०१९ पासून आता पर्यंत ५०४.८३ मि.मी. सरासरी एकूण पावसाची नोंद झाली आहे. दोडामार्ग ११६ मिमी, सावंतवाडी ५४मिमी, वेंगुर्ला १५०.२मिमी, कुडाळ ११० मिमी, मालवण १८१ मिमी, कणकवली ४२ मिमी, देवगड ११९, वैभववाडी ३० मिमी असा तालुकानिहाय पाऊस झाला आहे.

12

4