वेंगुर्लेत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचा उपक्रम
वेंगुर्ले, ता. २७ : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ वेंगुर्ले शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच निकाल जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकावलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील प्राथमिक शाळांची भेट घेतली. शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनिय यश संपादन केलेले गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांच्या कार्याचा गौरव तसेच त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अभिनंदन दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमा अंतर्गत वजराट नं.१, वजराट देवसू, मातोंड बांबर क्र.५, वेंगुर्ले नं.२, वेंगुर्ले नं. ३,वेंगुर्ले नं.४, परबवाडा नं.१,उभादांडा नं.१, रेडी नं.१ या शाळांना भेटी देवून गुणवत्ताधारक विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा वेंगुर्लेचे तालुकाध्यक्ष एकनाथ जानकर, सरचिटणीस सागर कानजी, महिला सेल अध्यक्ष अर्चना मांजरेकर, माजी तालुकाध्यक्ष झिलू गोसावी, विलास गोसावी, पांडुरंग चिंदरकर, रामचंद्र झोरे, दिपेश परब, विजय मस्के, राजेंद्र शेळके आदि पदाधिकारी उपस्थित होते. या शैक्षणिक दौऱ्यात सहभागी झालेल्या अखिलच्या सर्व पदाधिकारी शिलेदारांचे अभिनंदन व आभार तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.