कणकवली लाच प्रकरणी तहसीलदारासह दोघांना पोलीस कोठडी

2

सिंधुदुर्गनगरी, ता. २७ : लाकूड व्यापाऱ्याकडून मालकी हक्कासाठी आठ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या कणकवली तहसीलदार संजय पावसकर व लिपिक निलेश कदम यांना जिल्हा विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांनी २९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बुधवारी जिल्हा लाचलुचपत पथकाने हि कारवाई केली होती. त्यांना आज जिल्हा न्यायालयात हजर केले होते.

1

4