Tuesday, February 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याओरोस व्यापारी संघाचे १ जुलैचे आंदोलन स्थगित

ओरोस व्यापारी संघाचे १ जुलैचे आंदोलन स्थगित

आचारसंहितेपूर्वी व्यापारी संकुल भुखंड उपलब्ध करून देण्याचे आश्वासन

सिंधुदुर्गनगरी, ता. २७ : विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी व्यापारी संकुलासाठी भूखंड उपलब्ध करून देण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी आश्वासन दिल्यामुळे १ जुलै रोजी पुकारलेले दुकान बंद आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती सिंधुदुर्गनगरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेश पारकर यांनी दिली.
मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे सिंधुदुर्गनगरी येथील व्यापारी विस्थापित झाले आहेत. प्राधिकरण क्षेत्रातील एका भुखंडामध्ये व्यापारी संकुल उपलब्ध करून देण्याचे आश्वासित केले होते. मात्र १७ महिने लोटले तरी त्याची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाकडून होत नव्हती. अखेर २४ जुन रोजी सिंधुदुर्गनगरी येथील सर्व व्यापारी एकवटून जिल्हाधिका-यांना निवेदन देत आठ दिवसाची मुदत दिली होती. त्यानंतर १ जुलै रोजी दुकान बंद आंदोलन छेडू असा इशारा दिला होता.
दरम्यान, गुरुवारी दुपारी अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी येथील व्यापा-यांना चर्चेसाठी पाचारण केले होते. या चर्चेत व्यापारी संकुलासाठी येत्या विधानसभा निवडणुकांपुर्वी जागा उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आम्ही १ रोजीचे आंदोलन स्थगित करत असल्याची माहिती अध्यक्ष महेश पारकर यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष पांडुरंग मालवणकर, सचिव महादेव राणे, निलेश परब, ए आर सुतार, आनंद बागवे, धनंजय गावडे, अतुल आंबडोसकर, मनस्वी परब, रश्मी साने, आनंद पिंगूळकर आदी व्यापारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments