सावंतवाडी भाजपाच्या शहर कार्यकारिणीची उद्या बैठक

2

सावंतवाडी, ता. २७ : भाजपाची शहर कार्यकारिणीची बैठक उद्या तीन वाजता येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संघटनात्मक फेररचना करण्यासंबंधी चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष महेश सारंग त्यांनी दिली. भाजपाच्या सावंतवाडी शहरातील सर्व महिला, युवा पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ अध्यक्ष, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

4

4