Saturday, June 14, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याशिरोडा उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरच नाहीत

शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरच नाहीत

 

१० जुलै पर्यंत रिक्त पदे न भरल्यास उपोषण : सरपंचासह ग्रामस्थांचा इशारा

वेंगुर्ले, ता. २७ : शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात सध्या तीन डॉक्टर, एक स्त्रीरोग तज्ञ, भुलतज्ञ, क्ष किरण तज्ञ, आठ सफाई कामगार व दोन धुलाई कामगार पदे रिक्त असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. तरी शासनाने तात्काळ हि पदे भरावीत अशी मागणी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर व माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी ग्रामस्थांच्या वतीने निवेदनाव्दारे येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. देसाई यांच्याकडे केली आहे. दरम्यान सदर रिक्त पदे १० जुलै पुर्वी भरणा करावीत अन्यथा रुग्णालया समोर उपोषणास बसण्याचा इशारा सरपंचासह ग्रामस्थांनी दिला आहे.
शिरोडा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच श्री. उगवेकर यांच्यासह जि.प.सदस्य प्रितेश राऊळ, माजी सरपंच विजय पडवळ, सदस्य राहुल गावडे, कौशिक परब, सौ.मयुरी राऊळ, सौ. प्राची नाईक, युवासेनाधिकारी सागर नाणोसकर तसेच पांडूरंग नाईक, लक्ष्मीकांत कर्पे यांच्यासह ग्रामस्थांनी आज उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देऊन पहाणी केली. यावेळी डॉक्टर नसल्याने रुग्णांचे होणारे हाल व अनेक त्रृटी प्रामुख्याने समोर आल्या. सध्याची परिस्थिती गंभीर असून शासनाने याची गंभीरपणे दखल घ्यावी. शिरोडा रुग्णालयात मुळात तीन डॉक्टरांची पदे रिक्त असताना डॉ. वजराटकर यांची शासनस्तरावर झालेली बदली ही येथील रुग्णांवर अन्यायकारक आहे. उपजिल्ह्याचा दर्जा असणाऱ्या या रुग्णालयात किमान दोन सर्जन डॉक्टर कायमस्वरुपी असणे आवश्यक आहे. दर आठवड्याला येथे सात ते आठ सर्जरी होतात. सध्या एकही सर्जन उपलब्ध नसल्याने गोरगरीब रुग्णांना खाजगी हॉस्पिल मध्ये उपचार घ्यावे लागत आहे. खाजगी हॉस्पिटलटा खर्च हा सामान्य जनतेला न परवडणारा असून जनता यामुळे त्रस्त झालेली आहे.
शिरोडा ग्रामीण रुग्णालयामध्ये भूलतज्ञ कायमस्वरुपी असणे अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी भुलतज्ञ बाहेरुन आणावे लागतात ते येईपर्यंत बराचवेळ रुग्णांची हेळसांड होते. ओपीडीमध्ये दरदिवशी १०० च्यावर रुग्ण तपासणी व उपचारासाठी येत असतात त्यांना एक्स-रे साठी ताटकळत रहावे लागते कारण येथे आठवड्यातून फक्त तीन दिवस (मंगळवार, गुरुवार, शुक्रवार) क्षकिरण तंत्रज्ञ उपलब्ध असतात त्यामुळे लांबुन येणाºया रुग्णांची इतर दिवशी गैरसोय होते. क्षकिरण तंत्र हे पद कायमस्वरुपी भरण्यात यावे. तसेच औषध निर्माण अधिकारी हि तीन पदे असून या ठिकाणी फक्त एक पद भरलेले आहे. सकाळच्या वेळी ओपीडीचे रुग्णांना या गैरसोईला सामोरे जावे लागते. सफाई कामगार कमी असल्याने स्वच्छतेवर परिणाम होतो. एकंदरीत रुग्णालयाची सध्यस्थिती खूप गंभीर आहे. त्यामुळे सदर रिक्त पदे १० जुलै पुर्वी भरणा करावीत अन्यथा रुग्णालया समोर उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments