ऑल इंडिया ऑफिसर प्रशिक्षणात कळसुलकर स्कूलचे गोपाळ गवस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

706
2

सावंतवाडी, ता. २७ : ऑल इंडिया ऑफिसर प्रशिक्षण अकादमी नागपूर येथे पार पडलेल्या प्रशिक्षणा दरम्यान महाराष्ट्रातून सहभागी अधिकाऱ्यांमधून प्रथम श्रेणी प्राप्त केल्याबद्दल कळसुलकर इंग्लिश स्कूलचे सहाय्यक शिक्षक तथा एनसीसी अधिकारी गोपाळ गवस यांचा सत्कार करण्यात आला.
५८ एनसीसी बटालीयन सिंधुदुर्गच्या पार पडलेल्या कार्यक्रमात कोल्हापूर ग्रूप कमांडर ब्रिगेडीअर डी .बी. डोग्रा यांनी प्रशंसा पत्र देवून त्यांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास सिंधुदूर्ग माध्य शिक्षणाधिकारी अशोक कडूसही उपस्थित होते. त्यांनी मिळविलेल्या यशाबददल त्यांचे संस्था अध्यक्ष राजन पोकळे संचालक मंडळ मूख्याध्यापक एन.पी. मानकर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

4