वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचा सिंधुदुर्ग दौरा

2

 

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 : राज्याचे वैद्यकीय शिक्षण, बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण हे दिनांक 29 जून 2019 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

शनिवार दिनांक 29 जून 2019 रोजी सकाळी 10.30 वा. कणकवली येथे आगमन व भगवती मंगल कार्यालय येथे भाजप जिल्हा कार्यकारणी बैठकीस उपस्थिती, दुपारी 2.00 वा. कणकवली येथून गावराईकडे प्रयाण, दुपारी 2.45 वा. गावराई येथे आगमन व केंद्र शासनाच्या उज्वला योजनेअंतर्गत गॅस वाटप कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 3.45 वा. गावराई येथून सिंधुदुर्गनगरीकडे प्रयाण, दुपारी 4.00 वा. सिंधुदुर्गनगरी येथे आगमन व जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंबोली, चौकुळ, गेळे कबुलायतदार गावकार, जमीन व माणगांव खोरे आकारीपड जमीनीबाबत आढावा बैठक. सायं. 6.00 वा. शासकीय विश्रामगृह सिंधुदुर्गनरी येथे आगमन व राखीव, सायंकाळी 6.30 वा. सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्टेशन कडे प्रयाण, सायंकाळी 6.50 वा. कोकणकन्या एक्सप्रेसने पनवेलकडे प्रयाण.

12

4