सावंतवाडी, ता. 27 : येथील शिवसेनेच्या महिला उपतालुका संघटकपदी चित्रा मंगेश धुरी व मारिया डिमेलो या दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे माजगाव, आंबोली व कोलगाव, माडखोल असा कार्यभार देण्यात आला आहे. तर रोझी डिसोजा यांची उपविभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आज सावंतवाडी तालुका शिवसेनेची माजी सभा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी लोकसभा समन्वयक प्रदीप बोरकर यांच्या उपस्थितीत त्यांना ही जबाबदारी देण्यात आली. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा जान्हवी सावंत, अशोक दळवी, तालुका संघटक अपर्णा कोठावळे, अनारोजीन लोबो, अर्चना पांगम, भारती मोरे, निता सावंत, माधुरी वाडकर, रश्मी माळवदे, दिपाली सावंत, बाबू कुडतरकर, सागर नाणोसकर, शब्बीर मणियार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेच्या सावंतवाडी उपसंघटकपदी चित्रा धुरी व मारिया डिमेलो
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES