मराठा समाजाला मिळालेले आरक्षण नारायण राणेंच्या शिफारशीनुसार

2

सावंतवाडी/सिध्देश सावंत
मराठा आरक्षणासाठी राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल ग्राह्य धरला असला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अहवालातील निष्कर्ष आरक्षणासाठी फायद्याचे ठरल्याचे बोलले जात आहे. त्यांनी मांडलेल्या अभ्यास पूर्ण कशामुळे मराठ्यांना आरक्षण मिळेल शक्य झाले असाही दावा काही मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
मराठा आरक्षण मिळावे यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात श्री राणे यांची एक सदस्य समिती नेमण्यात आली होती. त्या समितीच्या माध्यमातून राणेंनी मराठ्यांना 20 टक्के आरक्षण द्यावे अशी शिफारस केली होती. त्या अहवालात राज्यातील साडेचार लाख कुटुंब मराठा समाजाची आहेत आणि त्यात 18 लाख लोकांचा समावेश आहे असे नमुद केले होते.त्यांनी सादर केलेला अहवाल 247 पानांचा अहवाल होता. विशेष म्हणजे मराठा समाज मागासलेला आहे असे पुरावे श्री राणे यांनी या अहवालात उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेता न्यायालयाने आज जाहीर केलेले आरक्षण राज्य मागास आयोगाच्या शिफारशी असले तरी त्या या शिफारसी श्री राणे यांच्या समितीने दिलेल्या निष्कर्षांचा समाज असल्याचे बोलले जात आहे

2

4