टेलिफोनच्या लाईन रस्त्यावर आल्याने वाहतूक एक तास ठप्प,वेंगुर्ले-दाभोली नाका येथील प्रकार

243
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले : ता.२८
वेंगुर्ले-दाभोली नाका येथील रस्त्यावरून जाणारी टेलिफोन ची लाईन पूर्णपणे रस्त्यावर आल्याने या मार्गावरील मोठ्या वाहनांची वाहतूक तब्बल एक तास खोळंबली होती.
वेंगुर्ले शहराला सेवा देणारी दूरसंचार विभागाची टेलिफोन लाईन सकाळी पूर्ण रस्त्यावर आली होती. त्यामुळे येथून गाड्या काढणे कठीण होत होते.गावातून वेंगुर्ले कडे येणाऱ्या एसटी बस या प्रकारामुळे रस्त्यावरच रखडल्या होत्या. परिणामी प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. अखेर दूरसंचार विभागाचे कर्मचारी एक तासा नंतर घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी प्रथम त्या लाईन बाजूला करून वाहतूक सुरू केली, आता पुढील जोडणीचे काम सुरू आहे. मात्र या प्रकारामुळे मोठ्या वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता.

\