पाच लाखाचे बक्षीस; अध्यक्षा संजना सावंत यांनी केले जाहीर…
सिंधुदुर्गनगरी ता.२८:
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०१८-१९ चा जिल्हास्तरीय निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात दोडामार्ग तालुक्यातील आयनोडे-हेवाळे ग्राम पंचायतीने बाजी मारीत प्रथम क्रमांक मिळविला आहे. द्वितीय क्रमांक कुडाळ तालुक्यातील हुमरस ग्राम पंचायतीने तर तृतीय क्रमांक देवगड तालुक्यातील बाबार्डे ग्राम पंचायतीने पटकाविला आहे. प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे पाच लाख, तीन लाख व दोन लाख असे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर केला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजूलक्ष्मी, सभापती जेरॉन फर्नांडिस, पल्लवी राऊळ, डॉ अनिशा दळवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे उपस्थित होते.