दोडामार्गात मीडिया प्रेस क्लबतर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव

2

 

दोडामार्ग, ता.२८ : दोडामार्ग तालुका वर्धापनदिनाचे औचित्य साधुन दोडामार्ग मिडिया प्रेस क्लबतर्फे आयोजित विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा गुरुवार २७ जुन रोजी सकाळी १० वा. महालक्ष्मी सभागृह, दोडामार्ग येथे संपन्न झाला. दहावी, बारावी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार यावेळी करण्यात आला.
यावेळी दोडामार्ग तालुक्यातील उत्तीर्ण विद्यार्थी उपस्थित होते. सी. ए. सुधिर नाईक यांनी दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. करिअर करायचं असेल तर निर्णय घ्यायाला शिका मार्ग नक्की सापडेल असा करिअर मंत्र दिला.
माजी सभापती धनश्री गवस यांनी दोडामार्ग मिडिया प्रेस क्लब आयोजित विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळ्याचे भरभरून कौतुक केले. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे आपल्याला काही क्षणातच बातमी पोहचते आणि आपण अपडेट राहतो. त्यासाठी मी दोडामार्ग मिडिया प्रेस क्लबला धन्यवाद देते असे उद्दगार त्यांनी काढले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकात जवळ जवळ ८०० कार्यक्रम केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध मोटिव्हेशनल ट्रेनर सदाशिव पांचाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आपण मनावर कसा ताबा मिळवावा बाह्य मन व अंतरमन यांचा फरक सांगताना तुम्हाला जे मिळवायचे त्यासाठी बाह्य मन व अंतर मन याचा योग्य मेळ घालायला शिका हे सांगितले.
तर पत्रकार व हेवाळे आयनोडे सरपंच संदीप देसाई यांनी दोडामार्ग मीडिया प्रेस क्लब यांना शुभेच्छा देताना दोडामार्ग तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यानचा सत्कार सोहळा आयोजित केल्याबद्दल कौतुक केले तसेंच आपण रोजगाराच्या कोणत्या संधी आहेत त्या ओळखायला शिका असे सांगितले. भेडशी येथील केथालिक चर्चचे फादर के. जॉर्ज यांनी मीडिया प्रेस क्लबच्या उपक्रमाचे कौतुक करताना उपस्थित विद्यार्थ्याना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास शिक्षण आरोग्य सभापती अनिशा दळवी, माँटिवेशनल ट्रेनर सदाशिव पांचाळ, पं. स. सदस्य धनश्री गवस, हेवाळे सरपंच संदिप देसाई, सी.ए.सुधिर नाईक, फादर जाँर्ज. के, भाजप शहराध्यक्ष योगेश महाले, मनसे शहराध्यक्ष अभिजित खांबल, मि.प्रे.क्ल.अध्यक्ष शिरिष नाईक आदी विद्यार्थी, पालक उपस्थित होते. यावेळी मीडिया क्लबचे भूषण सावंत यांनी सूत्रसंचालन, सुमीत दळवी यांनी प्रास्ताविक तर आभार प्रमोद गवस यांनी मांडले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेडिया प्रेस क्लबचे लवू परब, प्रथमेश गवस, आपा राणे, गोविंद शिरसाट व नारायण नाईक यांनी विशेष मेहनत घेतली.

1

4