मांडवी एक्सप्रेसचे कोलाड येथे इंजिन फेल…

275
2
Google search engine
Google search engine

रायगड, ता.२८: कोलाड येथे मुंबई मडगाव अशी धावणा-या मांडवी एक्सप्रेसचे इंजिन फेल झाल्यामुळे सुमारे एक तास गाडी थांबविण्यात आली आहे.अचानक उदभवलेल्या समस्येमुळे प्रवासी बैचेन झाले आहेत.
रोहा येथून पर्यायी इंजिन मागून मागून गाडी पूर्ववत करण्यात येणार आहे.अजून अर्धा तास लागण्याची शक्यता आहे,असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे मुंबई मडगाव गाडी दोन ते अडीच तास उशिरा धावणार आहे.याबाबतची माहिती रेल्वेचे प्रवासी व चौकुळ येथील सामाजिक कार्यकर्ते मनीष गावडे यांनी दिली.