तर सुप्रीम कोर्टातही आमची लढण्याची तयारी…

2

नितेश राणे ; ट्विटरच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट…

मुंबई ता.२८: हायकोर्टात गुरुवारी मराठा आरक्षणाचा निकाल लागला. यावेळी हायकोर्टाने राज्य सरकारकडून देण्यात आलेलं मराठा आरक्षण वैध असल्याचा निर्णय दिला. या निर्णयाविरोधात आरक्षणाविरोधातील याचिकाकर्त्यांनी विरोध करत सुप्रीम कोर्टात जाण्याची भाषा केली यावर काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी भाष्य केलं आहे.
हायकोर्टाच्या निकालाच्या विरुद्ध कोण सुप्रीम कोर्टात जायची भाषा करत असेल..तर आम्ही तिथे ही लढण्यासाठी तयार आहोत असं नितेश राणे यांनी स्पष्ट केलं आहे.

नितेश राणे यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, कोर्टाने मराठा आरक्षणाबाबत जो ऐतिहासिक निर्णय दिला. या लढ्याचा मी एक भाग होतो. या न्यायालयीन लढाईतही अंतिम निकालात माझं नाव याचिकाकर्ते म्हणून होतं त्याचा मला अभिमान आहे असं त्यांनी सांगितले.

0

4