बांधकामच्या निषेधासाठी मनसेकडून रस्त्यात वृक्षारोपण, रास्ता रोकोचा इशारा : भर पावसात आंदोलन करून वेधले लक्ष

2

सावंतवाडी, ता. २८ : वारंवार इशारा देवूनसुद्धा सावंतवाडी शहरातील रस्त्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करण्यासाठी आज मनसेच्यावतीने भरपावसात आंबोली-सावंतवाडी रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी बांधकामच्या अधिकार्‍यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान सोमवारपर्यंत खड्डे बुजविण्याचे काम सुरू न झाल्यास रास्ता रोको करू असा इशारा यावेळी पदाधिकार्‍यांकडून देण्यात आला. येथील जिमखाना मैदानासमोर पदाधिकार्‍यांनी भररस्त्यात वृक्षारोपण केले. यावेळी कामगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कासकर, विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, ओंकार कुडतरकर, संतोष भैरवकर, अतुल केसरकर, विनय सोनी, अनिकेत आसोलकर, मयुर लाखे, युवराज नाईक, संकेत मयेकर, किरण पाटील आदी उपस्थित होते. यावेळी श्री. कुडतरकर म्हणाले, झाराप-पत्रादेवी व सावंतवाडी-आंबोली या मार्गासाठी निधी मंजूर झाला होता. वारंवार अधिकार्‍यांचे लक्ष वेधूनही रस्त्याचे डांबरीकरण करण्यास वेळकाढू भूमिका घेण्यात आली. त्यामुळे सद्यस्थितीत रस्त्यावर खड्डे पडले असून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकार्‍यांना जाग येण्यासाठी आम्ही आज आंदोलन केले. सोमवारपर्यंत हे खड्डे बुजविण्याचे काम न सुरू झाल्यास त्या ठिकाणी रास्ता रोको करू.

4