हॕलो…..! करुळ घाटात अपघात झालाय!…

602
2
Google search engine
Google search engine
Google search engine

प्रशासनाची रंगीत तालीम; अन् सुटकेचा निश्वास टाकला…

वैभववाडी/पंकज मोरे ता.२८:: संध्याकाळचे ५. वाजले होते. सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी कामे आटोपून घरी जाण्याच्या तयारी होते. अन् फोन खणाणला… हॕलो…! करुळ घाटात धोकादायक वळणावर चार चाकी वाहन दरीत कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात बरेचशे प्रवासी जखमी झाले असल्याचे शब्द कानावर पडताच सर्वच कर्मचारी आपल्या ताफ्यातून घाटात रवाना झाले. घटनास्थळी पोहचल्यावर ही एक रंगीत तालीम असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. या घटनेची माहिती करूळ येथील सह्याद्री जीव रक्षक संस्थेला समजताच या टीमने घटना स्थळी धाव घेतली. व आपत्ती यंत्रणेच्या सूचनेनुसार संबंधित प्रशासनाच्या मदतीने दरीत उतरून प्रात्यक्षिक दाखवले. नव्याने गठीत करण्यात आलेल्या या सह्याद्री जीव रक्षक संस्थेच्या रक्षकांचे सर्वांनी कौतुक केले. पहिल्या प्रयत्नात मदत कार्यात ही सेवा भावी संस्था यशस्वी ठरली आहे.
येथील तहसिल कंट्रोल मध्ये चार चाकी वाहन दरीत कोसळल्याची माहिती प्राप्त होताच तहसीलदार रामदास झळके यांनी संबंधित यंत्रणेला संपर्क केला. १० ते १५ मिनिटाच्या कालावधीतच पोलीस, महसूल, सा. बां , आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचले. १०८ रुग्णवाहिकाही वेळेत पोहचली होती. जीव रक्षक संस्था ही वेळेत दाखल झाली. आपत्ती यंत्रणेच्या सुचनेनंतर जीव रक्षक संस्थेच्या टीमने दोरीच्या सहाय्याने दरीत उतरून प्रात्यक्षिक सादर केले. तहसीलदार झळके यांनी या सह्याद्री रक्षक संस्थेचे कौतुक केले. व त्यांच्या पाठीशी महसूल विभाग असल्याचे सांगितले. या संस्थेला शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असे तहसीलदार झळके यांनी सांगितले.
यावेळी पीएसआय शेणवी, नायब तहसीलदार श्री नाईक, संभाजी खाडे, कैलास पवार, डॉ. वाघमारे, एएसआय मडवी, समीर तांबे, एस. बी. कदम, श्री चिले, शिंदे, श्रीमती कुलकर्णी, श्री एकावडे, प्रवीण भागवत, काटकर, चव्हाण, श्री आचरेकर आदी उपस्थित होते. तर सह्याद्री जीव रक्षक संस्थेचे अध्यक्ष हेमंत पाटील, सुभाष पाटील, पो. पा. प्रताप पाटील, राजेंद्र वारंग, वसंत पाटील, रत्नाकांत पाटील, संजय पवार, विजय सावंत, विजय पवार, वैभव राणे, प्रकाश सावंत, जगदीश पाटील, अजय पवार आदी उपस्थित होते.

\