देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयाचा निकाल ९६ टक्के
सावंतवाडी, ता.२८: देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयाचा तृतीय वर्ष बी. एम. एस. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या पदवी अभ्यासक्रमाचा यावर्षीचा निकाल 96 टक्के लागला. यात कोमल विजय नाईक हिने सिंधुदुर्गासह महाविद्यालयात प्रथम क्रमांक येण्याचा मान पटकाविला. तर महाविद्यालयात द्वितीय क्रमांक ट्विंकल डिसोजा व तृतीय क्रमांक गौरेश मुळीक यांनी मिळवला.
महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एक विद्यार्थी गैरहजर राहिला. कोमल नाईक हिने एकूण 506 गुण मिळवत o ग्रेड मिळवली आहे. या यशाबद्दल तिचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकुर यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर संस्थेचे सचिव प्रभाकर पाटकर, सहसचिव सतीश पाटणकर, सीनियर एक्झिक्यूटिव्ह प्रवीण प्रभू केळुसकर व दत्तप्रसाद पाटणकर यांनीसुद्धा अभिनंदन केले. तिच्या या यशासाठी प्राचार्य यशोधन गवस, प्राध्यापक नाईक सर, पंडित सर, गवस मॅडम, संकपाळ मॅडम व इतर कर्मचारी वर्ग यांनी बरेच परिश्रम घेतले.