जिओ केबलच्या कामामुळे आंबेरी मेनरोडलगतची साईडपट्टी खचली

2

माणगाव / मिलिंद धुरी, ता, २८ : जिओ केबल लाईन टाकल्यामुळे आंबेरी गावांमधील मेन रोड लगद साईड पट्टी खचली आहे. ठेकेदाराने हे काम अर्धवट टाकले आहे.येथील ग्रामस्थांनी याबाबत चौकशी केली असता पीडब्ल्यूडीची कोणतीही अधिकृत परवानगी नसताना हा रस्ता खोदण्यात आला आहे. ठेकेदाराच्या भोंगळ कारभारामुळे जनतेला नाहक त्रास होत आहे. रस्त्याच्या बाजूला काही दुकान व्यवसायिक आहेत त्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शाळेतील मुलांना जाण्या-येण्यासाठी त्रास होतो. जिओ लाईनच्या ठेकेदाराकडे वेळोवेळी ग्रामस्थांनी काम पूर्ण करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली. परंतु याकडे ठेकेदार दुर्लक्ष करत आहे. जर या ठिकाणी अपघात झाल्यास जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.

12

4