देवगड तालुक्यात सर्वाधिक १३८ मि.मी पाऊस

189
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

सिंधुदुर्गनगरी, ता. २८ : जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असून देवगड तालुक्यात सर्वाधिक १३८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात ९५.०७ मिलीमीटर सरासरी पाऊस झाला असून १ जून पासून आता पर्यंत ५९९.९० मि.मी. सरासरी एकूण पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय चोवीस तासात झालेला पाऊस पुढील प्रमाणे असून कंसातील आकडेवारी आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाचे आहेत. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग ५३ (६०७), सावंतवाडी १०४ (३६१), वेंगुर्ला ९७.०६ (७२४.२४), कुडाळ ८० (५३९), मालवण ५९ (७५२), कणकवली १०४ (५९०), देवगड १३८ (६४०), वैभववाडी १२८ (५८६) पाऊस झाला आहे.

\