Sunday, January 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यातलाठी भरती परीक्षा उमेदवारांसाठी सूचना

तलाठी भरती परीक्षा उमेदवारांसाठी सूचना

 

सिंधुदुर्गनगरी, ता. २८ : महसूल विभागाच्या अखत्यारित असलेल्या तलाठी संवर्गातील रिक्तपदे भरण्याची कार्यवाही महा – आयटीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. सदर परीक्षेचे पूर्ण संचलन व कार्यान्वयन महा – आयटी (माहिती तंत्रज्ञान) विभागाच्या माध्यमातून ई-महापरीक्षा मार्फत होत आहे. उमेदवारांच्या पसंतीच्या जिल्ह्यात परीक्षा देण्यासाठी संगणक विषयक पायाभूत सोयी असणाऱ्या शाळआ, महाविद्यालयांची निवड महा – आयटी कडून करण्यात येऊन राज्यभरात एकूण १२२ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर उमेदवारांने पुढील सहा पैकी एक मुळ ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन अनुज्ञाप्ती, मतदान ओळखपत्र, मुळ फोटोसह राष्ट्रीयकृत बँक पासबूक, आधार कार्ड. ओळखपत्र फेरफार करुन तोतया उमेदवार येऊ नये यासाठी फोटो ओळखपत्र रंगीत झेरॉक्स, ई- आधारकार्ड आणि फोटो ओळखपत्राची सॉफ्ट कॉपी वैद्य ओळखपत्र पुरावा म्हणून स्वीकारले जाणार नाहीत. तशा स्पष्ट सूचना उमेदवारांच्या प्रवेशपत्रावर देण्यात आल्या आहेत.
महापरिक्षा पोर्टलवरून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा चालू असताना नियमांचे पालन केले जात आहे किंवा कसे, काही गैरप्रकार होत नाही ना यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर निरिक्षक म्हणून व महा – आटीच्या मुंबई येथील कमांड रुममध्ये परीक्षा निरीक्षक म्हणून प्रत्येकी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. महा परीक्षा पोर्टलवरील तसेच हॉल तिकीटवरील सूचनांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन करावे. अधिक माहितीसाठी किंवा तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक 1800 3000 7766 व enquiry@mahaoariksah.gov.in या मेलवर संपर्क साधावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments