गणेश चतुर्थीनिमित्त आरसेटीतर्फे महिलांसाठी प्रशिक्षण वर्गांचे आयोजन

2

 

सिंधुदुर्गनगरी,ता.२८ : बीओआय स्टार सिंधुदुर्ग आरसेटीअंतर्गत महिला वर्गासाठी व्यावसायिक पाककला प्रशिक्षण वर्ग आरसेटी कुडाळ येथे आयोजित करण्यात येणार आहेत. १० दिवसांच्या या प्रशिक्षण वर्गामध्ये खास महिलांसाठी आंबा मोदक, काजू मोदक, फणस मोदक, ऊकडी मोदक व इतर खाद्य पदार्थांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण वर्गाची वैशिष्टे पुढील प्रमाणे आहेत. मोफत प्रशिक्षण, चहा, नाष्टा व जेवणाची मोफत सोय, व्यावसायिक कौशल्य, तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, बॅंकींग व सरकारी योजनांबद्दल मार्गदर्शन, मार्केटिंग, व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षण, मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाची उपलब्धी. अधिक माहितीसाठी व प्रशिक्षण नोंदणीसाठी बँक ऑफ इंडिया सिंधुदुर्ग आरसेटी कुडाळ येथे 02362-222986, 8275364736, 9405830756 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन बी.जी. मंडळ, संचालक, आरसेटी कुडाळ यांनी केले आहे.

11

4