पालकमंत्री दीपक केसरकर यांचा सिंधुदुर्ग दौरा

259
2

 

सिंधुदुर्गनगरी, ता. २८ : राज्‍याचे गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर हे दिनांक २९ जून २०१९ रोजी सिंधुदुर्ग जिल्‍ह्याच्‍या दौऱ्यावर येत असून त्‍यांचा जिल्‍हा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दिनांक २९ जून २०१९ रोजी सकाळी ६ वा. कणकवली रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह कणकवली कडे प्रयाण, सकाळी ६:१५ वा. शासकीय विश्रामगृह कणकवली येथे आगमन व राखीव. सकाळी ८:३० वा. जिल्हाधिकारी, अधिक्षक अभियंता राष्ट्रीय महामार्ग, कुडाळ व कणकवली तालुक्याचे प्रांताधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली व सावंतवाडीचे कार्यकारी अभियंता, कंपनीचे प्रतिनीधी, निवेदक नागरिक व सर्व संबंधित अधिकारी यांच्या समवेत कणकवली पासून मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी, नंतर मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गकडे प्रयाण, सकाळी १०:३० ते ११:३० जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक, अधिक्षक अभियंता राष्ट्रीय महामार्ग, आर.टी.ओ. कुडाळ व कणकवलीचे प्रांताधिकारी व तहसिलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली व सावंतवाडीचे कार्यकारी अभियंता, कंपनीचे प्रतिनिधी, निवेदक नागरिक व संबंधित सर्व अधिकारी यांच्या समेवत मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाबाबत आढावा व चर्चा, सकाळी ११:३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन विभागाचे सर्व अधिकारी व संबंधित सर्व अधिकारी यांच्या समवेत जिल्हा नियोजन कार्यकारी समितीची आढावा बैठक, दुपारी १ वा. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी यांच्या समवेत चांदा ते बांदा संदर्भात बैठक, दुपारी ३ वा. जिल्हाधिकारी, प्रांत, तहसिलदार, नगर रचनाकार, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी, पर्यटन अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी, समन्वय समितीचे अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी यांच्या समवेत आंबोली, चौकुळ, गेळे काबुलायतदाराच्या अडीअडचणी संदर्भात यापूर्वी झालेल्या बैठकीबाबत पूर्व चर्चा, दुपारी ४ वा. जिल्हाधिकारी, प्रांत, तहसिलदार, नगर रचनाकार, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी, पर्यटन अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी, समन्वय समितीचे अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी यांच्या समवेत आंबोली, चौकुळ, गेळे, काबुलायतदारांच्या अडीअडचणी संदर्भात वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा रविंद्र चव्हाण यांच्या समवेत आढावा बैठक, सायंकाळी ५ वा. जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, उप संचालक, आरोग्य, कोल्हापूर, जिल्हा आरोग्य अधिकारी, दोन्ही कार्यकारी अभियंता व सर्व संबंधित अधिकारी यांच्या समवेत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगासंदर्भात आढावा बैठक, सायं. ५:३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, दोन्ही कार्यकारी अभियंता व सर्व संबंधित अधिकारी यांच्या समवेत जिल्हा खनिज निधी मधून करावयाच्या कामासंदर्भात बैठक, सायं. ६ वा. जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी यांच्या समवेत खडीच्या संदर्भात बैठक, सायं. ६:३० वा. तिल्लारी प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबतची समस्या व नाहरकत मिळण्याबाबत दि. २५ जून रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी व कणकवलीचे कार्यकारी अभियंता, एमएसईबीचे कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभागाचे संबंधित अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक, रात्री सोईनुसार कोकणकन्या किंवा मत्स्यगंधा एक्सप्रेसने ओरोस किंवा कुडाळ येथून मुंबईकडे प्रयाण.

4