पत्रकारांनी आरोग्याची काळजी घ्यावी : महेंद्र मुरकर

183
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली येथे रोटरी क्लब-पत्रकार संघाचे आरोग्य शिबिर

कणकवली, ता.28 : पत्रकार नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासून काम करत असतो. अनेकदा सामाजिक परिवर्तनासाठी लेखणीच्या माध्यमातुन काम करताना पत्रकारांचा आरोग्याकडे दुर्लक्ष होतो. पत्रकारांना काम करताना मानसिक दबावाखाली काम करावे लागते. त्यासाठीच रोटरी क्लब कणकवलीच्यावतीने पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केले. त्या शिबिराला चांगला प्रतिसाद पत्रकारांनी दिला. त्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त करतो. पत्रकार आणि रोटरी क्लबचे जिव्हाळ्याचे नाते असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लबचे अध्यक्ष महेंद्र मुरकर यांनी केले.
कणकवली संजीवनी हॉस्पिटल येथे रोटरी क्लब व कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने आयोजित आरोग्य शिबिराच्या शुभारंभ डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या हस्ते झाला. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष महेंद्र मुरकर, डॉ. विद्याधर तायशेटे, सेक्रेटरी दिशा अंधारी, खजिनदार लवू पिळणकर, ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, संतोष वायंगणकर, तालुकाध्यक्ष भगवान लोके, सचिव नितीन सावंत, जिल्हा उपाध्यक्ष रमेश जोगळे, लक्ष्मीकांत भावे, संतोष राऊळ, दिलीप हिंदळेकर, मिलिंद डोंगरे, रोटरी क्लबचे दीपक बेलवलकर, नितीन म्हापणकर, अ‍ॅड. दिपक अंधारी, दादा कुडतरकर, राजेश सरकारे, तुषार सावंत, चंद्रशेखर तांबट, रंजिता तहसीलदार, महेश सरनाईक आदींसह पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.

\