वर्षा पर्यटनासाठी मांगेली-फणसवाडी धबधबा सज्ज

427
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दोडामार्ग, ता. २८ : वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला मांगेली फणसवाडी धबधबा प्रवाहीत झाला असून मांगेलीच्या वर्षा पर्यटनास सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवर हा धबधबा आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगानी वेढलेल्या आणि हिरव्या वनराईने नटलेल्या मांगेलीचे पर्यटन पावसाळ्यात चांगलेच उजळते. या वर्षा पर्यटनात सर्वांना आकर्षून घेतो तो मांगेली फणसवाडी धबधबा. दरवर्षी या धबधब्याला गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील पर्यटक भेट देतात. चालूवर्षी हा धबधबा वरुणराजाच्या लहरीपणामुळे थोडा उशिरा सुरू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने मांगेली धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. परिणामी मांगेलीचे वर्षा पर्यटन आता बहरणार आहे.

\