सावंतवाडी, ता. २८: येथील मोती तलावात असलेल्या स्कुबा डायविंग प्रकल्पाला विरोध करण्यामागे विधानसभा निवडणुकाची राजकीय कीनार असण्याची शक्यता नाकारता येत नाही असा संशय काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते डॉ.जयेद्र परूळेकर यांनी व्यक्त केला.
दरम्यान शहराचा विकास होणे गरजेचे आहे.त्यामुळे अशा प्रकारच्या प्रकल्पांसाठी सर्व पक्षीयांनी एकत्र येणे गरजेचे आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आज श्री परूळेकर यांनी पत्रकार परिषद घेतली.ते म्हणाले पर्यटन प्रकल्प सुरू केल्यानंतर अवघ्या चार तासात त्या ठिकाणी मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी येतात तो प्रकल्प बंद पाडतात हा सर्व प्रकार म्हणजे दुर्दैवी आहे.एकीकडे सावंतवाडी शहराचा विकास होणे गरजेचे आहे. शहराच्या बाहेरून हायवे, रेल्वे ,बाहेरून गेल्यामुळे शहर अनेक समस्यांना तोंड देत आहे. अशा परिस्थितीत एखादा पर्यटन वृध्दी करणारा उद्योग या ठिकाणी आणला गेला तर त्याचा स्वागत होणे गरजेचे होते.मात्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत तो प्रकल्प बंद पाडला. हे अत्यंत घाणेरडे राजकारण आहे याच्या मागे राजकीय व्यक्तीची किनारा हे आगामी काळात येणाऱ्या विधानसभा लक्षात घेऊन हा प्रकार त्यांनी केला आहे. त्यामुळे याच्या मागे नेमका कोण याचा सर्व जनतेने घ्यावा. अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तत्परता दाखवली. परंतू तलावात अशाप्रकारे हस्तक्षेप करण्याचा मेरिटाइम बोर्डाला अधिकार नसतो. समुद्रकिनाऱ्यावर सुरू असलेल्या सर्वच स्कुबा डायव्हींग अधिकृत आहेत का ?याचे उत्तर द्यावे आम्हाला कोणाच्या विरोधात जाण्याची गरज नाही परंतु असा प्रकार होत असेल तर ते चुकीच आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीला हद्दपार करण्यासाठी आणि सर्वपक्षीयांनी एकत्र यावे असे त्यांनी सांगितले.
स्कुबा डायव्हींग बंद होण्यामागे विधानसभेची राजकीय कीनार | जयेंद्र परूळेकर:पर्यटन वृध्दीसाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येण्याची गरज
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES