भाजप जिल्हा कार्यकारिणीची उद्या कणकवलीत बैठक | नव्या कार्यालयाचेही उद्घाटन :राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती

130
2
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.२८ : भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शहरातील दुर्गाराम मंगल कार्यालय येथे उद्या ता.२९ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. तत्पूर्वी शहरातील नरडवे रस्ता येथील भाजपच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा देखील होणार आहे. भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी याबाबतची माहिती दिली. भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे.
येत्या राज्य विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजप पक्षाकडून विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबविले जाणार आहेत. त्याबाबतची माहिती जिल्हा कार्यकारिणी बैठकीत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना दिली जाणार आहे. यात ६ जुलैपासून भाजप सदस्यता अभियान सुरू होणार आहे. यात नवीन सदस्य नोंदणी तसेच असलेल्या सदस्यांची माहिती नव्याने भरून घेतली जाणार आहे. याखेरीज १ ते १५ ऑगस्ट या दरम्यान भाजपच्या महिला कार्यकर्त्या रक्षाबंधन कार्यक्रम राबविणार आहेत असे श्री.जठार म्हणाले.
दरम्यान १ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत भाजपकडून ‘दिसतोय फरक… शिवशाही परत’ हा उपक्रम राबवला जाणार आहे. यात भाजप सरकारकडून राबविण्यात आलेल्या विविध योजना आणि त्याचे सर्वसामान्यांना झालेले फायदे तसेच विविध यशस्वी उपक्रमांची माहिती प्रत्येक मतदारापर्यंत पोचवली जाणार असल्याचीही माहिती श्री.जठार यांनी दिली.