Tuesday, December 9, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामाडखोल सोसायटीच्या चेअरमनपदी कृष्णा राऊळ...

माडखोल सोसायटीच्या चेअरमनपदी कृष्णा राऊळ…

संचालकांच्या बैठकीत निवड; व्हाईस चेअरमनपदी प्रकाश नाईक…

सावंतवाडी,ता.२७: माडखोल सोसायटीच्या चेअरमनपदी कृष्णा ऊर्फ जिजी सुमन राऊळ यांची निवड करण्यात आली आहे.तर व्हाईस चेअरमनपदी प्रकाश आत्माराम नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित संचालकांच्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून आ.र आर आरोंदेकर उपस्थित होते .

या सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप प्रणित पॅनलने १३ पैकी १३ जागांवर विजय मिळवीत महाविकास आघाडीच्या पॅनेलला धक्का दिला होता.यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन दत्ताराम राघोबा कोळमेकर , नवनिर्वाचित संचालक अँड सुरेश आडेलकर , आनंद राऊळ , संजय राऊळ , आडेलकर , नंदू दळवी , जनार्दन लातये , विष्णू ठाकूर , गोपिका राऊळ , संतोष मेस्त्री , रंजीता चव्हाण , भिकाजी जाधव उपस्थित होते . यावेळी नवनिर्वाचित चेअरमन जीजी राऊळ यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून विविध कृषि व फलोत्पादन योजनांचा लाभ गावातील शेतकरी व लघु उद्योजकांना देण्यात येणार असून महिलावर्गाही रोजगारासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

यावेळी सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे भाजपचे जिल्हा चिटणीस तथा जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग , भाजप उपतालुका प्रमुख अशोक माळकर , सरपंच बाळू शिरसाट , माजी सरपंच राजन राऊळ , देवस्थान मानकरी दत्ताराम ऊर्फ भाई राऊळ , सत्यविजय तावडे , अनिल परब , सहदेव राऊळ , नारायण राऊळ , वासुदेव राऊळ , विलास सावंत , सुमंत राऊळ , वासुदेव होडावडेकर , लखन आडेलकर , प्रकाश देसाई , नाना मेस्त्री , पांडुरंग राऊळ , गुरु राऊळ , आनंद राऊळ , संतोष तेली यांनी अभिनंदन केले .

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments