वराड सोनवडे पुलाचे काम पूर्ण झाले नाही का..? रणजित देसाईंच्या कोपरखळी नंतर सभागृहात हास्यकल्लोळ

209
2

सिंधुदुर्गनगरी, ता. २८ : वराड-सोनवडे पुलाचे काय झाले? असा प्रश्न स्थायी समितीत संतोष साटविलकर यांनी विचारला. यावर उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी ‘पूल अजून पूर्ण झाले नाही. मला वाटले पूर्ण झाले असेल? असे आश्चर्यकारक प्रश्न विचारल्याने सभागृहात हास्यांचा एकच कल्लोळ उडाला.
लोकसभा निवडणुकीपूर्वी खा. विनायक राऊत यांनी मोठा गाजावाजा करीत या पुलाचे भूमिपूजन केले होते. मात्र, सीआरझेड परवानगी मिळाली नसल्याने याचे काम अद्याप सुरु झालेले नाही. त्यामुळे संतोष साटविलकर यांनी हा प्रश्न मुद्दाम उपस्थित केला. यावर सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्याने सीआरझेड परवानगी न मिळाल्याने वराड-सोनवडे पुलाचे काम सुरु न झाल्याचे सांगितले. यावरून सभागृहात राजकीय कोपरखळी चांगल्याच झाल्या. सीआरझेड परवानगी नसताना भूमिपूजन कसे केले? असा प्रश्न साटविलकर यांनी केला. त्यावर अधिकाऱ्याने कामाला कार्यारंभ आदेश असल्याचे सांगितले. यावर रणजित देसाई यांनी साटविलकर व माझा मतदारसंघ जोडणारा हा पूल असल्याचे सांगितले.

4