Sunday, December 14, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याश्री बांदेश्वर कलशारोहण वर्धापनदिन हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न...

श्री बांदेश्वर कलशारोहण वर्धापनदिन हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न…

बांदा,ता.२७: हजारो भाविकांच्या अलोट गर्दीत बांदा येथील प्रसिद्ध जागृत स्वयंभू  श्री देव बांदेश्वर मंदिराच्या कलशारोहणाचा “सहावा वर्धापन दिन” सोहळा आज मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२०१६ साली करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या शुभहस्ते श्री बांदेश्वर मंदिराचे सुवर्ण कलशारोहण झाले होते.तेव्हापासून दरवर्षी चैत्र कृष्ण द्वादशीला या कलशारोहणाचा वर्धापनदिन सोहळा थाटात साजरा होतो.फक्त गेली दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंधांमुळे केवऴ धार्मिक विधी करुन मर्यादीत स्वरुपात हा कार्यक्रम करण्यात आला होता. यावर्षी पुन्हा एकदा श्री बांदेश्वर दर्शनासाठी भाविकांचा जनसागर लोटला.

बुधवारी  सकाळी श्री गणपती पुजन, देवतास नारळ, विडे अर्पण करुन  गाऱ्हाणे करुन सोहऴ्यास आरंभ झाला.यावेळी संकल्प करुन देव बांदेश्वर मंदिरात लघुरुद्र अनुष्ठान, श्री देवी भुमिका मंदिरात श्रीसुक्त आवर्तन जप अनुष्ठान, श्री गणेश मंदिरात गणपती अथर्वशीर्ष आवर्तन जप अनुष्ठान करण्यात आले.ब्राम्हणवृंदाच्या मंत्रौच्चारात मंदिरातील वातावरण चैतन्यमय बनले होते. दुपारी महाआरती होऊन श्री बांदेश्वर नामाचा जयघोष करुन सर्वांच्या कल्याणासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले.त्यानंतर महाप्रसादास आरंभ झाला. सायंकाऴी भजन व गायनाचा कार्यक्रम तर

रात्रौ श्रींचा मंदिराभोवती सवाद्य पालखी प्रदक्षिणा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहऴ्यासाठी श्री देव बांदेश्वर भुमिका देवस्थान सदस्य तसेच बांदेश्वर भक्त ,भाविक,सेवेकरी,महिला सर्व भक्तीभावाने कार्यरत होते.शशी पित्रे यांच्या आस्वाद कोकमतर्फे सर्व भाविकांसाठी कोकम सरबत वाटप करण्यात आले.या वितरणाचे व्यवस्थापन बांदा पतंजली योग समितीने केले.

मंदिर व परिसरात फुलांची सजावट,आकर्षक रोषणाई व सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments