Monday, November 10, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यास्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे "ब्रेन डेव्हलपमेंट" परीक्षेत यश...

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे “ब्रेन डेव्हलपमेंट” परीक्षेत यश…

सावंतवाडी,ता.२७: कोलगाव येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी “ब्रेन डेव्हलपमेंट” परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. २०२०-२१ वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे ३४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक रुजुल पाटणकर यांनी कौतुक केले.

सहभागी विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी चार्लस लोबो हिने “सुवर्णपदक” पटकाविले. तर ऐश्वर्या तेली हिने कास्य पदक मिळविले. तसेच जानवी जानकर, जानवी सावंत, वरद राणे, सई नाईक, फेथ फर्नांडिस, गायत्री तानावडे, यशमित ठाकूर, लिशा सामंत, रायसा परुळेकर आदि विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.

इयत्ता दुसरी मध्ये माझ पटेल व मनवा साळगावकर सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या. तर गौरिष परब याने रौप्य पदक मिळविले. तसेच ऋषिल परुळेकर, निधी शिर्के, गौरांग परब, या विद्यार्थ्यांनी कास्य पदक प्राप्त केले आहे.तर सक्षम ओटवणेकर, ऋतुजा पेडणेकर, सान्वी पावसकर, प्रत्यूषा घोगळे, आरोही सावंत, देवांग सारंग आरव नाटेकर, कमलजा चिंदरकर या विद्यार्थ्यांनी सुद्धा घवघवीत यश संपादन केले.

इयत्ता तिसरी मध्ये अस्मि सावंत, स्पृहा आरोंदेकर या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकाविले. तर अस्मि तेंडोलकर, सोहम देशमुख यांनी रौप्यपदक व वैष्णव सावंत या विद्यार्थ्याने कास्य पदक प्राप्त केले आहे. तसेच वैदही शिरोडकर, रोहन दुर्वेश, तनिष्क निर्मले, या सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.

यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेच्या शिक्षिका व इतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री. पाटणकर यांनी कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments