Sunday, December 14, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याहरकुळ खुर्द आणि नागवे सोसायटीवर शिवसेना पॅनेलची सत्ता...

हरकुळ खुर्द आणि नागवे सोसायटीवर शिवसेना पॅनेलची सत्ता…

कणकवली,ता.२८: तालुक्यातील हरकुळ खुर्द व नागवे सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना आणि भाजपचे उमेदवार बिनविरोध ठरले. तर शिवसेनेचे उमेदवार सर्वाधिक असल्याने या दोन्ही सोसायटी शिवसेनेच्या ताब्यात आल्या आहेत.
हरकुळ खुर्द विकास सेवा सोसायटीच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या ९ उमेदवारी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. या सोसायटी च्या १३ पैकी ९ जागा शिवसेनेच्या तर ४ जागा भाजपच्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे मतदान प्रकिया टळली आहे.
शिवसेनेच्यावतीने तडजोड करून भाजपला चार जागा देऊन हरकुळ खुर्द सेवा सोसायटी बिनविरोध निवडून आली आहे. हरकुळ खुर्दमध्ये शिवसेना पॅनलचे धोंडु रासम, विलास रासम, अशोक राणे, संजय रावले, सुर्याजी रासम, आदेश भोसले, शामसुंदर बोडेकर, गितांजली रासम, वंदना घाडी तर भाजपच्या पॅनलमधुन आशुतोष रासम, शामसुंदर रासम, विठ्ठल नारकर, राजेंद्र डिचवलकर हे बिनविरोध आले आहेत.
तालुक्यातील नागवे सेवा सोसायटीमध्येही शिवसेनेच्या पॅनलची सत्ता आली आहे. येथे शिवसेना पॅनलने ७ तर भजपाला ५ जागा सोडल्या आहेत. त्यामुळे नागवे सेवा संस्थेची निवडणूक ही बिनविरोध झाली असून या दोन्ही सोसायटीवर शिवसेनेचे सत्ता स्थापन होणार आहे.
नागवे सोसायटीमधून सर्वसाधारण कर्जदार गटात अनिल मुरकर, चंद्रकांत सावंत, दिनकर मेस्त्री, मयुरी जाधव, पांडुरंग सातवसे, भिकाजी सांगवेकर, सुरेंद्र दळवी, नंदा जाधव, महिला प्रतिनिधी म्हणून सुरेखा जाधव, पूजा हुले इतर मागास प्रवर्ग मधून सचिन खेडेकर आणि अनुसूचित जाती जमाती मधून राजेंद्र आर्लेकर हे बिनविरोध निवडून आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments