राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची मागणी; अजित पवारांची घेतली भेट…
सावंतवाडी,ता.२८: शहरासाठी नव्याने मैला व्यवस्थापन प्रक्रिया केंद्रास मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. दरम्यान यासाठी आवश्यक असलेला निधी निश्चितच उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन पवार यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले. सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष अर्चना परब यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेण्यात आली.
शहरात असलेल्या मैला उपसा केंद्राची क्षमता संपली आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप होत आहे. परिणामी नव्याने यंत्रणा उपलब्ध करून द्यावी,अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांनी आज श्री पवार यांची भेट घेतली.
यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवा टेमकर, राकेश नेवगी आदी उपस्थित होते.



