Friday, December 13, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडीत ३ जुलैपासून विठ्ठल रखुमाई हरिनाम विणा सप्ताह

सावंतवाडीत ३ जुलैपासून विठ्ठल रखुमाई हरिनाम विणा सप्ताह

विठ्ठल रखुमाई मंदिरतर्फे आयोजन : नामवंत कलाकार करणार विठ्ठल रखुमाई चरणी सेवा अर्पण

सावंतवाडी, ता. २८ : विठ्ठल रखुमाई मंदिर सावंतवाडी तर्फे विठ्ठल रखुमाई हरिनाम विणा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त खुली अभंग गायन स्पर्धा व जिल्ह्य़ातील व जिल्हयाबाहेरील नामवंत कलाकारांचे भजन, कीर्तन व संगीत मैफिलींचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार ३ जुलै रोजी “अर्चना फाऊंडेशन” पुरस्कृत “खुली अभंग गायन स्पर्धा” १५ ते ३५ वयोगटासाठी(युवागट) सायंकाळी ठीक ७ वाजता होणार आहे. गुरूवार दि ४ जुलै रोजी “अर्चना फाऊंडेशन” पुरस्कृत खुली अभंग गायन स्पर्धा, विवाहीत महिला व पुरुषांसाठी(प्रौढ गट) सायंकाळी ठीक ७ वाजता पार पडणार आहे. शुक्रवार ५ जुलै रोजी सुप्रसिद्ध गायिका “सौ भाग्येश्री आठल्ये-जोशी”(देवगड) यांचा अभंग, भक्तीगीत व नाट्यगीतांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास साथसंगत निलेश मेस्त्री (हार्मोनियम) , किशोर सावंत (तबला) , प्रसाद मेस्त्री (पखावज) करणार आहेत व सूत्रसंचालन संजय कात्रे(माणगांव) करणार आहेत. कार्यक्रम सायंकाळी ठीक ७ वाजता होणार आहे. शनिवारी ६ जुलै रोजी “कलर्स मराठी गौरव महाराष्ट्राचा शोध सुरेल नात्यांचा” मानकरी सुप्रसिद्ध युवा गायक “श्री सागर प्रभाकर मेस्त्री”(मुंबई) व सिंधुस्वररत्न ठरलेली कु समृद्धी तानाजी सावंत(सावंतवाडी) यांचा सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, कार्यक्रमास साथसंगत निलेश मेस्त्री (ऑर्गन), कु. निरज मिलिंद भोसले(तबला) , कु. प्रणव प्रसाद मेस्त्री(पखावज), कु. मंगेश मेस्त्री (हार्मोनियम) करणार आहेत तर उत्कृष्ट अभिनेता निलेश गुरव(कुडाळ) कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ठीक ७ वाजता सुरू होणार आहे. रविवारी ७ जुलै रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता श्री. पुराणे बुवा भजनी मंडळ,वेंगुर्ला (वारकरी भजन) यांचे भजन होईल व त्यानंतर सायंकाळी ठीक ८ वाजता सौ.सिद्धी पिळगांवकर-सुर्लेकर(गोवा) यांचा सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमास साथसंगत निलेश मेस्त्री(हार्मोनियम), किशोर सावंत व कु. निरज मिलिंद भोसले. (तबला) व संजय कात्रे निवेदन करणार आहेत. सोमवारी ८ जुलै रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता झी मराठी _”सा रे ग म प”_ फेम कोकणकुमार श्री गणेश मेस्त्री(कुडाळ) व सुप्रसिद्ध गायिका कु वर्षा देवण(सावंतवाडी) यांचा अभंग भक्तीगीत व नाट्यगीतांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला ऑर्गनसाथ निलेश मेस्त्री, तबलासाथ किशोर सावंत, पखावज साथ श्री प्रसाद मेस्त्री व हार्मोनियमसाथ कु मंगेश मेस्त्री करणार आहेत तर निवेदन संजय कात्रे करणार आहेत. व त्यानंतर रात्री ठीक १० वाजता श्री नवार मित्रमंडळ, वेंगुर्ला यांचे वारकरी भजन होणार आहे. मंगळवारी ९ जुलै रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता संत तुकाराम वारकरी मंडळ , नेमळे यांचे वारकरी भजन व दिंडी बुवा विश्राम शिवाजी नागवेकर होणार आहे व रात्री १० वाजता पारंपारिक सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी 12 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त सकाळी ६ वाजता काकड आरती व पूजा, सकाळी ठीक ११ वाजता सद्गुरु संगीत विद्यालय सावंतवाडी यांचा अभंग भक्तीगीत व नाट्यगीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे , सायंकाळी ठीक ५ वाजता मान्यवरांच्या हस्ते “खुल्या अभंग गायन” स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होईल. व सायंकाळी ७ वाजता ह.भ.प संदिप मांडके(पुणे) यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे त्याना ऑर्गनसाथ श्री निलेश मेस्त्री तर तबलासाथ श्री किशोर सावंत करणार आहेत. विठ्ठल रखुमाई मंदिर येथे हा हरिनाम विणा सप्ताह होणार असून सर्व भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विठ्ठल रखुमाई हरिनाम विणा सप्ताह समिती यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments