Sunday, December 14, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याबांदा-खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलला कला दिग्दर्शक सुकांत देसाई यांनी दिली भेट...

बांदा-खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलला कला दिग्दर्शक सुकांत देसाई यांनी दिली भेट…

बांदा,ता.२८: अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाचे सभासद आणि कला दिग्दर्शक सुकांत देसाई यांनी खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल आणि डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयाला भेट दिली. प्रशालेचे माजी विद्यार्थी असणारे देसाई हे मूळचे पडवे माजगाव येथील रहिवासी आहेत. खेमराज मेमोरियल मध्ये बारावी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथे कला शिक्षक पदविका आणि नंतर मुंबई येथे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स मधून फाईन आर्ट मधील पदवी संपादन केली. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाशी संलग्न असलेल्या अखील भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सभासद असणारे सुकांत देसाई हे सध्या कला दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत. खेमराज मेमोरियलच्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत देसाई यांनी कला क्षेत्रातील विविध संधी आणि यशाच्या वाटा या संबंधी मार्गदर्शन केले. बऱ्याच वेळा आवड असूनही कला क्षेत्राचा मार्ग निवडायला हुशार विद्यार्थी घाबरतात अशा विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन मोलाचे ठरले. प्रशालेच्या वतीने पर्यवेक्षक नंदूकिशोर नाईक यांनी सुकांत देसाई यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. या प्रसंगी शिक्षक एस. व्ही. नाईक, संतोष परब, मिलन वसकर, सुमेधा सावळ, जी. एम्. काळे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments