बांधकामच्या गटारांची पालिका कर्मचार्‍यांकडून साफसफाई पाणी तुंबले : नागरिकांकडून अधिकार्‍यांविषयी नाराजी

2

सावंतवाडी, ता. 28 : आज झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील बाहेरचावाडा परिसरातील रस्त्यावर पाणीचपाणी झाले. सार्वजनिक बांधकामने आपले गटार साफ न केल्याने ही परिस्थिती उद्भवली. अखेर याबाबतची माहिती पालिकेला दिल्यानंतर पालिकेच्या कर्मचार्‍यांनी भर पावसात ही गटारे साफ केली.
दरम्यान या प्रकाराबाबत नागरिकांकडून सार्वजनिक बांधकाम अधिकार्‍यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. तुंबलेल्या गटारांकडे अधिकार्‍यांनी लक्ष देणे गरजेचे होते. मात्र दुर्दैवाने त्यांच्याकडून दिरंगाई झाली, असा आरोप करत तात्काळ त्या ठिकाणी धाव घेणार्‍या पालिका कर्मचार्‍यांचे आभार मानण्यात आले.

4