अर्चना घारे यांच्याकडून आरपीडी हायस्कुलला पुस्तकांची भेट

2

सावंतवाडी, ता. २८ : येथील विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या पक्ष निरीक्षक व अर्चना फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.अर्चना घारे-परब यांनी येथील आरपीडी हायस्कूलला भेट देत विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन पुस्तके भेट म्हणून दिली.

सौ. अर्चना घारे-परब या मूळ सावंतवाडीतल्या असून त्या आरपीडी हायस्कूलच्या माजी विद्यार्थी आहेत. शाळेसाठी आपण काहीतरी देणे लागतो अशा कृतज्ञ भावनेतून आणि उदात्त हेतूने त्यांनी नुकतीच या संस्थेला भेट देत येथे शिक्षण घेणार्‍या मुलांसाठी करिअर मार्गदर्शन यावर आधारित पुस्तके संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत यांच्याकडे सुपूर्त केली. यावेळी शामराव माने, संदीप राणे, विनायक परब आदी उपस्थित होते.
सौ. घारे परब या सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. अलीकडेच त्यांनी सावंतवाडी दोडामार्ग व वेंगुर्ला भागात अनेक सामाजिक उपक्रम राबविले. दरम्यान संस्थेला दिलेल्या पुस्तकरुपी भेटीने संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

1

4