दोडामार्ग, ता. २८ : कुडाळ-पिंगुळी येथील धुरी बांधवांवर खोटी अँट्रासिटि केस दाखल केल्याने मराठा समाजावरील अन्याय सहन केला जाणार नाही असे मत आजच्या बैठकीत अँड.सोनु गवस यांनी मांडले. दोडामार्ग महाराजा हाँल येथील आयोजित बैठकीत ते बोलत होते.
पुढे बोलताना म्हणाले, अनेक आंदोलनानंतर मराठा समाजाला आरक्षण मंजूर झाल्याने मराठा समाजाच्या लढ्यास सहकार्य केलेल्या सर्वाचे आभार तसेच मराठा समाजापुढे अडचणी वेळी आम्ही बाजू मांडणार असुन पिंगुळी येथील खोट्या तक्रारीचा निषेध व्यक्त करतोय. मराठा समाजावरील अन्याय सहन केला जाणार नसुन उद्या २९ जून रोजी ११ वा. दोडामार्ग तहसीलदार, पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात येणार असून मराठा बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष अँड.सोनू गवस यांनी केले. यावेळी सुर्यकांत गवस, बाळा गवस, उदय पास्ते, वैभव ईनामदार, संदेश गवस, प्रेमानंद देसाई, संदिप गवस, रामकृष्ण दळवी, तळेखोल सरपंच सुरेश सावंत, सुदेश मळीक, गणेशप्रसाद गवस उपस्थित होते.