त्या मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांची मालमत्तेची चौकशी करा

2

मुख्यमंत्र्यांकडे मागणी: सावंतवाडी पालिकेचे पदाधिकारी आक्रमक

सावंतवाडी ता 29
येथील मोती तलावात सुरू करण्यात आलेले स्कुबा डायविंग चार तासात बंद करणाऱ्या त्या मेरिटाईम बोर्डाचे अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मेरिटाईम बोर्डाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली असल्याची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे पालिका बैठकीत दिली आज येथे झालेल्या पालिका बैठकीत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी अधिकाऱ्यांनी बंद पडलेल्या स्कुबा ड्रायविंग प्रकल्पावरून अधिकाऱ्यांना टार्गेट केले यावे अशा प्रकारची भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निषेध करण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला यावी परिमल नाईक यांनी अशा प्रकारे प्रकल्प बंद पडले गेल्यास या ठिकाणी पर्यटन रूजणार कसे असा प्रश्न करत संबंधित अधिकाऱ्यांना तलावात सुरू असलेले बोटिंग प्रकल्प बंद करण्याचे अधिकार नाहीत असे सांगितले तर नगरसेवक राजू बेग यांनी अशा प्रकारे प्रकल्प बंद करून संबंधित अधिकाऱ्यांनी सावंतवाडीच्या नागरिकांसह नगराध्यक्षांचा अपमान केला आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी केली या मागणीला उत्तर देताना साळगावकर यांनी आपण मुख्यमंत्र्यांकडेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्या मालमत्तेची चौकशी करा अशी मागणी केल्याचे सांगितले या प्रक्रियेचे नगरसेवक परुळेकर उपनगर यापेक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी अनुमोदन दिले झालेला प्रकार चुकीचा आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षितच आहे असे त्यांनी सांगितले

17

4