शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात लवकरच सर्जन डॉक्टरच देणार

246
2
Google search engine
Google search engine
Google search engine

डॉ.धनंजय चाकूरकर यांचे सरपंच श्री.उगवेकर यांना आश्वासन…

वेंगुर्ले ता.२७:
शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व अन्य कर्मचारी यांची पदे रिक्त असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. तरी शासनाने तात्काळ हि पदे भरावीत अन्यथा आंदोलनाचा इशारा सरपंच मनोज उगवेकर यांच्यासह ग्रामस्थांनी दिला होता. त्यामुळे जिल्हा चिकित्सक अधिकारी डॉ. धनंजय चाकूरकर यांनी सरपंच श्री उगवेकर यांची भेट घेतली व लवकरच सर्जन उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले आहे.
शिरोडा सरपंच मनोज उगवेकर व माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी ग्रामस्थांसह दोन दिवसांपूर्वी रुग्णालयाला भेट दिली होती. तसेच येथे सध्या तीन डॉक्टर, एक स्त्रीरोग तज्ञ, भुलतज्ञ, क्ष किरण तज्ञ, आठ सफाई कामगार व दोन धुलाई कामगार पदे रिक्त असल्याने रुग्णांचे हाल होत असल्याची बाब समोर आणली होती. यावेळी उपसरपंच रवी पेडणेकर, ग्रा प सदस्य राहुल गावडे, कौशिक परब , निलेश मयेकर , तृप्ती परब , समृद्धी धानजी , वेदिका शेट्ये , स्वरूपा गावडे , विशाखा परब, सदस्य सौ.मयुरी राऊळ, सौ. प्राची नाईक, युवासेनाधिकारी सागर नाणोसकर तसेच माजी सरपंच विजय पडवळ, पांडूरंग नाईक, लक्ष्मीकांत कर्पे
सामाजिक कार्यकर्ते सोनू गवस , उत्तम आरोस्कर , अवधूत तांडेल, पंकज नाईक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. याची दखल घेऊन डॉ. चाकूरकर यांनी सरपंच यांची भेट घेऊन लवकरच सर्जन डॉ. देण्याचे आश्वासन दिल्याचे सरपंच उगवेकर यांनी सांगितले.

\