सावंतवाडी मराठा समाज संघटनेच्या अध्यक्षपदी सीताराम गावडे…

2

सावंतवाडी ता.२९: तालुका मराठा समाज अध्यपदी जेष्ठ पत्रकार सिताराम गावडे तर उपाध्यक्ष म्हणून सी.ए लक्ष्मण नाईक यांची निवड करण्यात आली नुकत्याच पार पडलेल्या मराठा समाजाच्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.येत्या महिन्याभरात उर्वरित कार्यकारिणी जाहीर करून मंडळ अधिकृत रजिस्टर करण्यात येणार असल्याचे येथील सकल मराठा समाजाचे समन्वयक विक्रांत सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
येथील विश्रामगृहावर सावंतवाडी तालुक्यातील सकल मराठा बांधवाची बैठक झाली.यावेळी विविध विषयावर चर्चा होऊन तालुक्यातील मराठी बांधवांची भावना लक्षात घेता मराठा बांधव व विद्यार्थी यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने मराठा समाज संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ते म्हणाले मंडळाच्या कार्यकारिणीवर राजकारणाबाहेरील व्यक्ती घेण्यात येणार असून राजकीय क्षेत्रातील व्यक्ती सल्लागार म्हणून राहणार आहेत.
यावेळी शामराव सावंत,सचिन गावडे,पत्रकार शिवप्रसाद देसाई,अभिमन्यू लोंढे,अभय किनळोसकर,प्रशांत कोठावळे,अपर्णा कोठावळे,जीवन लाड,राजेश सावंत आदी उपस्थित होते.

25

4